Friday, January 17, 2025
HomeAssembly Electionमहाराष्ट्राची लुट थांबविण्यासाठी महाविकास आघाडी व सुभाषभाऊ धोटेंना विजयी करा

महाराष्ट्राची लुट थांबविण्यासाठी महाविकास आघाडी व सुभाषभाऊ धोटेंना विजयी करा

Make Maha Vikas Aghadi victorious to stop looting of Maharashtra: Telangana Chief Minister Revanth Reddy.

चंद्रपूर :- भाषावार प्रांत रचनेमुळे आपले राज्य वेगवेगळे झालेत पण आपण सर्व एकाच परिवारातील म्हणजे भारत देशाचे सदस्य आहोत. हा भारत, हा महाराष्ट्र विरांचा, क्रांतीवीरांचा, समाजसेवकांचा आहे. केंद्र सरकारला सर्वात जास्त टॅक्स महाराष्ट्र देते परंतु केंद्र सरकार विकासकामासाठी पुरेसा निधी येथे देत नाही. काही नेते, त्यांचे व्यापारी मित्र आणि येथील धोकेबाज नेते महाराष्ट्राची लुट करीत आहेत. महाराष्ट्राचे भुमीपुत्र बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांना धोका देऊन त्यांनी भाजप सोबत सरकार स्थापन केले परंतु या धोकेबाजांना धडा शिकवायचा आहे. हे लुटारू लोक शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनतेला महागाईच्या गर्तेत ओळत आहेत. आम्ही सत्तेवर आल्याबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, बेरोजगारांना रोजगार, महिलांना सुविधा दिली आहे आणि महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा यासर्व गोष्टी तसेच Rahul Gandhi राहुल गांधींच्या ५ गॅरंटी नक्की सुरू होणार आहे. त्यामुळे आ. सुभाषभाऊ धोटे Subhash Dhote यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, ते निवडून आल्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळावी यासाठी दिल्ली हायकमांडकडे मी शब्द खर्च करणार अशी ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी Telangana CM Revanth Reddy यांनी महाविकास आघाडी द्वारा समर्थित भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाष धोटे यांच्या प्रचारार्थ महात्मा फुले विद्यालय राजुरा येथे आयोजित प्रचार सभेत उपस्थित हजारो नागरिकांना दिली. Make Maha Vikas Aghadi victorious to stop looting of Maharashtra

तर आ. सुभाष धोटे यांनी आपल्या कारकीर्दीत आपण अनेक विकासकामे पूर्ण केली असून येणाऱ्या काळात क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पून्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले.

यावेळी काँग्रेसचे एआयसीसी सचिव डॉ. संपत कुमार, निरीक्षक अनुप फिलिप, खा. किरण रेड्डी, श्रीधरराव गोडे, विजयराव बावणे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वामी येरोलवार, सविता टेकाम, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उत्तमराव पेचे, तुकाराम झाडे, गणपत आडे, राष्ट्रवादी (श. प) चे अरुणभाऊ निमजे, शिवसेना (उभाठा) चे सागर ठाकुरवार, निर्मला कुडमेथे, संध्या चांदेकर, कुंदा जेणेकर, शिवसेना उभाठा चे नितीन पिपरे, बबन उरकुडे, डॉ. खनके, अजमेरा श्याम नाईक, नरसिंग मादर, सुनील देशपांडे, शंतनू धोटे, नरेश मुंदडा, एजाज अहमद, उमेश गोनेलवार यासह काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पक्ष आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular