Monday, April 20, 2026
HomeMaharashtraचंद्रपूर परिमंडळात 'लाईनमन दिन' उत्साहात साजरा

चंद्रपूर परिमंडळात ‘लाईनमन दिन’ उत्साहात साजरा

‘Lineman Day’ celebrated with enthusiasm in MSEDCL’s Chandrapur circle

चंद्रपूर :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ४ मार्च हा दिवस देशभरात “लाईनमन दिन” म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) च्या चंद्रपूर परिमंडळातील सर्व २९ उपविभागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वीज वितरण व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या लाईनमन व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. Lineman Day’ celebrated with enthusiasm in MSEDCL’s Chandrapur circle

चंद्रपुरात बीआयडीसी स्थापन करा

चंद्रपूर येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता हरीश गजबे व अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी दोन्ही मान्यवरांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून सर्व लाईनमन बांधवांचे पुष्प देऊन स्वागत केले व “समृद्धीचे, विकासाचे, नाते प्रकाशाचे; ग्राहक समाधान हेच महावितरणचे ध्येय” या संदेशाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सर्वांना वीज सुरक्षेची शपथ देण्यात आली.

मुख्य अभियंता गजबे यांनी आपल्या मनोगतात लाईनमन हे महावितरणचे ‘आधारस्तंभ’ असल्याचे सांगितले. ऊन, वारा, पाऊस, पूर अशा प्रतिकूल परिस्थितीतही वर्षाचे ३६५ दिवस अखंड सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळेच ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळतो, असे ते म्हणाले. चंद्रपूरच्या कडक उन्हात तसेच गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात काम करताना सुरक्षेला प्राधान्य द्यावे, आपल्या जीवनमानाची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांनी लाईनमन दिनानिमित्त सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत वीज बिल वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश दिले. नव्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही त्यांनी भर दिला.

कार्यक्रमास कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दाव्हेकर, कार्यकारी अभियंता योगेंद्र निचत (चाचणी विभाग), कार्यकारी अभियंता विकास शहाडे (प्रशासन), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, वरिष्ठ व्यवस्थापक राकेश बोरिवार यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तांत्रिक कर्मचारी विजय इंगोले, सरोजिनी लोखंडे, रोशना कामतवार व सुमेध वनकर यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या अनुभवांना उजाळा दिला.

यावेळी औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा व कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष दिलीप वावरे उपस्थित होते. पुंडलिक वणवे आणि डॉ. अनिष नायर यांनी सुरक्षा विषयक मार्गदर्शन केले.

चंद्रपूरसह बल्लारशा, वरोरा, गडचिरोली, आलापल्ली व ब्रम्हपुरी येथेही लाईनमन दिन साजरा करण्यात आला. सर्व ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेची शपथ घेत वीजसेवेत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular