Tributes paid to late MP Balubhau Dhanorkar through various social activities
चंद्रपूर :- दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त चंद्रपूर जिल्ह्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करून आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याचं स्मरण करत गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यात आला. Birth anniversary of late MP Balubhau Dhanorkar
खासदार प्रतिभाताई धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सर्व कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी काँग्रेस नेते, पदाधिकारी, अधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महाकाली मंदिरात अन्नदान, तर बल्लारपूर येथे मातोश्री वृद्धाश्रमात सर्वांना अन्नदान करण्यात आले. तसेच, कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे नवजात बालकांकरिता मच्छरदाण्यांचं वाटप करण्यात आले.

वरोरा शहरातही दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि शहीद डाहुले चौक येथे भोजन दान करण्यात आले, तसेच छत्र्यांचं वाटप करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे नियमित रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन व्यवस्थेचं उद्घाटन करण्यात आले. various social activities
भद्रावती येथे प्रेरणा अंध विद्यालयासाठी मारुती व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भोजन दान करण्यात आले. तसेच, सरकारी रुग्णालय, भद्रावती येथे फळ वाटप आणि छत्र्यांचं वाटप करण्यात आले. बंगाली कॅम्प येथील वृद्धाश्रमात धान्य वाटप करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या सार्वजनिक सेवेतील समर्पणावर आणि चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. खासदार म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची यावेळी आठवण करून देण्यात आली. त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी विविध राजकीय व्यक्ती, पक्ष कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
                                    


