Friday, April 17, 2026
HomeMPस्व. बाळुभाऊ धानोरकर स्मृतिप्रित्यर्थ कबड्डी प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे संपन्न

स्व. बाळुभाऊ धानोरकर स्मृतिप्रित्यर्थ कबड्डी प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे संपन्न

Kabaddi training camp in memory of late Balubhau Dhanorkar successfully concluded

चंद्रपूर :- वरोरा तालुका क्रिडा संकुल येथे नुकतेच स्व. बाळुभाऊ धानोरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कबड्डी प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे पार पडले. जय हिंद मंडळ वरोरा आणि प्रवीण काकडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या एक महिन्याच्या शिबिरात कबड्डी खेळाडूंना राष्ट्रीय स्थरावरील प्रशिक्षण मिळाले.

हरियाणातील सुप्रसिद्ध प्रशिक्षक संदीप धूल यांनी खेळाडूंना कबड्डीचे बारकावे आणि प्रगत तंत्रे शिकवून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन केले. आज खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते श्री. संदीप धूल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. संदीप धूल यांच्या मार्गदर्शनामुळे खेळाडूंच्या कौशल्यात लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी बाबाराव आगलावे, प्रवीण काकडे, काशिफ खान, गणेश गौरकर आणि हर्षल आवारी यांनी विशेष परिश्रम घेतले. Kabaddi training camp in memory of late Balubhau Dhanorkar

या प्रशिक्षण शिबिरामुळे वरोरा तालुक्यातील कबड्डी खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची आणि खेळाचे उच्च तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मिळाली. यापुढेही असेच उपक्रम आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल, असे आयोजकांनी सांगितले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular