Irai Dam discharge increases, alert issued to villages
चंद्रपूर :- ईरई धरणातील पाणीपातळीत वाढ झाल्याने आज सकाळी ७ वाजल्यापासून धरण विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे ३ गेट प्रत्येकी १ मीटरने तर ४ गेट प्रत्येकी ०.७५ मीटरने उघडण्यात आले असून, धरणाचे सर्व सातही दरवाजे विसर्गासाठी खुले करण्यात आले आहेत. Irai Dam discharge increases
या विसर्गामुळे ईरई नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचोली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आदी गावांसह नदीकाठच्या परिसरात पाणी वाढण्याचा धोका आहे. alert issued to villages
प्रशासनाने सर्व नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.