Irai Dam discharge increases; Alert issued to villages along the river
चंद्रपूर :- गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे ईरई धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणाच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने आज मंगळवारी सकाळी ७ वाजता प्रशासनाने विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेतला. Irai Dam discharge increases
धरणाचे ३ गेट प्रत्येकी १ मीटर तर ४ गेट प्रत्येकी ०.७५ मीटरने उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून खालच्या प्रवाहातील गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, नदीकाठच्या गावांमधील रहिवाशांनी खबरदारी घ्यावी, नदी पात्रात जाणे टाळावे तसेच लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे. शेतकऱ्यांनी नदीपात्राजवळील शेतातील जनावरे, साधनसामग्री व पिके सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Alert issued to villages along the river
धरण परिसरासह चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही पावसाची स्थिती कायम असल्याने पुढील काही दिवसांत पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.