‘International Yoga Day’ at Kamaladevi Education College
चंद्रपूर :- सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, बालाजी वार्ड, चंद्रपूर येथे “आंतरराष्ट्रीय योग दिन” २१ जून २०२५ ला साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक चंद्रपूर महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्व जिल्हा प्रभारी सौ. नसरीन शेख व योग शिक्षीका सौ. अपर्णा चिडे, सौ. वंदना संतोषवार यांनी आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉल नूसार विविध आसने, ध्यान, प्राणायाम याचे प्रास्तक्षिक व महत्व सांगीतले.
तसेच प्राचार्य मा. डॉ. हेमकांत वाकडे कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर, प्राध्यापिका सूचिता खोब्रागडे, प्राध्यापिका अश्विनी सातपूडके, प्राध्यापिका डॉ. जयमाला घाटे, प्राध्यापिका डॉ. प्रगती बच्चूवार, प्राध्यापिका वनिता हलकरे, तसेच ग्रंथपाल श्री. चंदन जगताप, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग श्री. मोरेश्वर गाऊत्रे यांनी विद्यार्थ्यां सोबत योगासने केली.

सदर कार्यकमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक पी. आर. मालखेडे बजाज तंत्रनिकेतन चंद्रपूर यांनी केले. तसेच आभारप्रदर्शन प्राध्यापिका वनिता हलकरे यांनी केले.
मान्यवरांनी योगासनाद्वारे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य उत्तम राखता येते व प्राणायम हा विविध रोंगावर कसा उपयुक्त आहे हे समजावून सांगीतले. तसेच सर्वांनी योग करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमासाठी प्रथम व द्वितीय बी. एडं. अभ्यासक्रमातील छात्राध्यापक व छात्राध्यापिका यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे साजरा केला.
