Inquire and audit smart prepaid meters in Babupeth area
चंद्रपूर :- बापूपेठ परिसरात अलीकडेच बसविण्यात आलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे नागरिकांना वाढीव व अनियमित वीज बिलांचा सामना करावा लागत असून परिसरात संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात अनेक तक्रारी आम आदमी पार्टीकडे पोहोचल्या आहेत. Inquire and audit smart prepaid meters in Babupeth
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण विभागाला निवेदन देत बापूपेठमधील सर्व स्मार्ट प्रीपेड मीटरचे तात्काळ तांत्रिक ऑडिट व चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, ऑडिट पूर्ण होईपर्यंत नवीन मीटर बसविण्याचे काम थांबविण्याची अट घातली आहे.
आम आदमी पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे की, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल. Aam Aadmi Party’s warning of agitation
या वेळी आपचे राज्य संघटन सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, संघटन मंत्री संतोष बोपचे, सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, बाबुपेठ अध्यक्ष राजू तोंडासे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, हर्षल नेवलकर, जयदेव देवगडे, मनीष राऊत, अनुप तेलतुंबडे आदी उपस्थित होते.