Inner Wheel Club of Smart City Chandrapur celebrates Teachers’ Day
चंद्रपूर :- इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूरतर्फे चिचाला येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन Teachers Day उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शिक्षकांचा सन्मान, मार्गदर्शन सत्र व विद्यार्थ्यांसाठी साहित्याचे वाटप हे होते. Inner Wheel Club of Smart City Chandrapur celebrates Teachers’ Day गणेश विसर्जन “सुरक्षेची घ्या काळजी”
या दिवशी एकूण 20 शिक्षकांचा त्यांच्या प्रशंसनीय कार्याबद्दल प्रेमाचे प्रतीक, बॅज व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. गणेश विसर्जन दरम्यान, चंद्रपूर वाहतुकीत बदल
क्लबच्या अध्यक्षा व मानसशास्त्रज्ञ सोनम कपूर यांनी “कार्य-जीवन संतुलन” या विषयावर शिक्षकांसाठी मार्गदर्शन सत्र घेतले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणे आणि आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे याबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांमध्ये मिठाई व पुस्तके वाटप करून शिक्षण अधिक सुलभ व आनंदी बनविण्यात आले.
या कार्यक्रमाला इनरव्हील क्लबच्या प्रमुख पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती लाभली. त्यात जिल्हा अध्यक्षा रमा गर्ग, सचिव शाहीन शफीक, प्रकल्प संचालक व क्लब प्रतिनिधी पूनम कपूर, खजिनदार सुनीता जैस्वाल, उपाध्यक्षा सीमा गर्ग, माजी अध्यक्षा उमा जैन व शकुंतला गोयल, सदस्य मीरा अग्रवाल आणि भावना बुद्धदेव यांचा समावेश होता.
मुख्य मान्यवरांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक नामदेव आस्वले, शिक्षक प्रदीप टिपले, राहुल वैद्य, संजय निकेसर जुनघरे, तसेच उपाध्यक्षा संध्याताई ठाकरे, सन्मानित सदस्य पेंदोर ताई, निशाने ताई, प्रकाशभाई शेंडे व कैलास खुजे उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप शाळेतील शिक्षक व क्लब सदस्यांमध्ये नाश्ता आणि मिठाईचे वाटप करून करण्यात आला.