Friday, March 21, 2025
HomeEducationalइन्फंटची प्रिन्सी जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत अव्वल.

इन्फंटची प्रिन्सी जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत अव्वल.

Infant’s Princi toper’s in district level chess tournament

चंद्रपूर :– इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा Infant Jesus School येथील इयत्ता 9 वी सीबीएसई ची विद्यार्थीनी कु. प्रिन्सी बारई हिने 17 वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून जिल्हात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. Chess Competition

वरील स्पर्धा विसापूर क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. यात १५ तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

विसापूर क्रीडा संकुल येथे तसेच विभागीय स्तरावर नागपूर येथे होणाऱ्या बुद्धीबळ स्पर्धेसाठी ती चंद्रपूर जिल्ह्य़ाचे प्रतिनिधीत्व करणार असून तिच्या सोबत आनखी ४ बुद्धीबळ खेळाडू जाणार आहेत.

तिच्या या यशाबद्दल आमदार सुभाष धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षिरसागर, शुभम बनैवार, यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, पालक व विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular