Thursday, October 30, 2025
HomeAccidentखासदारांचा संवेदनशीलपणा : अपघातग्रस्त युवकाला तात्काळ आर्थिक मदत

खासदारांचा संवेदनशीलपणा : अपघातग्रस्त युवकाला तात्काळ आर्थिक मदत

MPs’ sensitivity: Immediate financial assistance to accident victim youth

चंद्रपूर :- बल्लारपूर रोडवरील एका अपघातग्रस्त पीयूष उमेश पेंदोर यांना, खासदार प्रतिभाताई धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या विशेष प्रयत्नातून एकात्मिक आदिवासी विकास विभागाकडून तात्काळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. Immediate financial assistance to accident victim youth

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना पीयूष उमेश पेंदोर यांच्या अपघाताची माहिती मिळताच, त्यांनी जराही वेळ न घालवता प्रशासनाशी संपर्क साधला. पीयूष यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या या संवेदनशील आणि वेगवान कार्यवाहीमुळे एकात्मिक आदिवासी विकास विभागाने तातडीने दखल घेत पीयूष यांना ही मदत मंजूर केली. MP Pratibha Dhanorkar’s sensitivity

या मदतीमुळे पीयूष आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. उपचारासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची सोय झाल्याने त्यांना मोठा आधार मिळाला आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी नेहमीच सामान्य नागरिक आणि गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

याप्रसंगी बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “आपल्या लोकसभा क्षेत्रातील कोणताही नागरिक अडचणीत असेल तर त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने या युवकाला वेळेत मदत मिळाली याचा मला खूप आनंद आहे. भविष्यातही नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन.”

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular