Grand Blood Donation Camp in Chandrapur on Martyrs’ Day
शहीद दिनानिमित्त चंद्रपुरात भव्य रक्तदान शिबीर; शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
चंद्रपूर :- शहीद भगतसिंग, सुखदेव थापर आणि राजगुरू यांच्या ९५ व्या शहीद दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. Grand Blood Donation Camp in Chandrapur on Martyrs’ Day
युवा शहीद बहुउद्देशीय संस्था, योगनृत्य परिवार, जे.सी.आय. चंद्रपूर ईलाईट, अंचलेश्वर मित्र परिवार, बिर खालसा सेवादल, बॉईस ऑफ श्री छत्रपती, टायगर बहुउद्देशीय संस्था, न्यू सम्राट बाल गणेश मंडळ, संत रविदास युवा मंच, रक्तदान महादान निस्वार्थ सेवा, लाईफ लाईन रक्तदान ग्रुप व आर. जिम महाकाली वार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्मृती जपण्यासाठी व समाजात बंधुभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थितांनी शहीदांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके, डॉ. विश्वास झाडे, गोपाल मुंधडा, मुरली मनोहर व्यास, प्रभुजी चोथवे, सर्वनसिंग सबुजा, प्राचार्य संजय बेले, डॉ. बारसागडे, डॉ. बन्सोड, डॉ. निमगडे, डॉ. आनंद वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष सतनाम सिंग मिरधा यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात विलास सातपुते, सोनु जुमनाके, आकाश सोनुर्ले, राजेश बरे, सुनिल मुकुटलावार, राजदिप सिंग मिरधा, मनोज पोदोज्जवार, संजु लडवे, शितल गुंटूकवार, शेखर मंत्री, शैलेश लेहेरिया, शिवम मुंधडा, किशन बजाज, दिनेश पिंपळकर, शशि ठक्कर, श्रवण मुंधडा, सौरव कडलवार, रितेश बडवाईक, अमित पॉल, अजय हेडाई, चेतन भगत, प्रिया सरकार, साक्षी मांदे यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले.
रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांनी “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.