Funding confusion in Janani Shishu Suraksha Yojana
चंद्रपूर :- जिल्ह्यात जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गरोदर महिला व १ वर्षाखालील बालकांसाठी शासन दररोज मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देते. मात्र, रुग्णवाहिकेच्या देखभाल खर्चासाठी मिळणारे अनुदान अत्यंत अपुरे ठरत असून, डिझेल व देखभाल खर्च भागत नाही. परिणामी, जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर असून, याकडे खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.
तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भारताचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. Funding confusion in Janani Shishu Suraksha Yojana; Ambulance service on the verge of being disrupted
केंद्र शासनाच्या जननी सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना रुग्णवाहिका सेवा पुरवण्यात अडचणी येत आहेत. शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत मातांना उपचार व औषध पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. यासोबतच या योजनेतील कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून वेतनाविना आहेत. तसेच, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमही आर्थिक अडचणींमुळे अडचणीत आला आहे.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून निधीची मागणी करूनही शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. MP Pratibha Dhanorkar attracts attention
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्यात निधीअभावी अनेक सेवा विस्कळीत होत असून, संचालक (वित्त व लेखा), राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी उपलब्ध शिल्लक निधीतून मानधन देण्याचे आदेश दिले होते. केंद्र शासनाकडून अपेक्षित असलेली पाचव्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणा धोक्यात सापडली आहे. संबंधित निधी तातडीने अदा करण्यात यावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.



