Friday, August 14, 2026
HomeHealth१११ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

१११ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

चंद्रपूर :- धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड च्या वतिने सामाजिक दायित्व निधीअंतर्गत विविध उपक्रम निरंतर राबविले जातात. विकासात्मक व इतर सोयी सुविधा पुरविणे हेच उद्दिष्ट नसून नागरिकांना योग्य आरोग्य सेवा पुरविणे हे सुद्धा आहे. ग्रामीण भागातील नागरिक अनेकदा आर्थिक तंगीमुळे तसेच भागात विशेष आरोग्य सेवांच्या अनुउपलब्धतेमुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करित असल्याचे दिसते. “नर सेवा – नारायण सेवा” हे ब्रीद आपण नेहमी ऐकले असून यापेक्षा पुण्यरूपी कार्य दुसरे नाही. हे आरोग्य शिबीर म्हणजे या उद्दिष्टाची संकल्पपूर्ती करण्याचा प्रयत्न आहे असे संबोधन धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे प्लांट हेड देवेश कुमार यांनी केले. मोरवा येथे आयोजित मोरवा येथे निःशुल्क भव्य आरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले. Free health check-up for 111 citizens in Morva

धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड , पहेल मल्टिपर्पज सोसायटी चंद्रपूर आणि ग्रामपंचायत मोरवा यांच्या संयुक्त विद्यमाने समाज भवनात निःशुल्क भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी (BP & Sugar Testing) तसेच त्वचारोग तपासणी करून नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. हा उपक्रम धारिवाल कंपनीचे स्टेशन हेड श्री. देवेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. Healthcare initiative by Dhariwal Infrastructure as part of its social responsibility

प्रसंगी मुख्य व्यवस्थापक डॉ. अनिश नायर, मोरवा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती स्नेहा साव, उपसरपंच श्री. भूषण पिदूरकर, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे श्री. प्रतीक वानखेडे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. पल्लवी पडलमवार, डॉ. ज्ञानेश्वर लांडगे, गणपती ऑप्टिकल्सचे श्री. सुदर्शन झुंजारवार तसेच प्रकल्प समन्वयक श्री. ब्रँडन डिसोझा यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्योगाच्या माध्यमातून सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविले जात आहेत. शिबिराचा लाभ गांवातील अनेक नागरिक घेत आहेत, त्यांना आपल्या आरोग्याची इत्यंभूत माहित या शिबिरात दिली जात असल्याचे समाधान सरपंच स्नेहा साव यांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केले. गांवातील सर्व नागरिकांनी या भव्य व सुलभ शिभिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करीत या यशस्वी आयोजनासाठी उद्योग व्यवस्थापनाचे आभार व्यक्त केले. भविष्यात ग्रामस्थांना लाभदायक ठरतील असे विशेष आरोग्य शिबिर, सांधेदुखी व एच.आय.व्ही./एड्स तपासणी शिबिर आयोजित करण्याची विनंती सुद्धा यावेळी सरपंच यांनी केली.

शिबिरामध्ये १११ नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, डोळ्यांची तपासणी व दृष्टीविषयक मार्गदर्शन, रक्तदाब व मधुमेह तपासणी तसेच त्वचाविकारांची तपासणी करून आवश्यक उपचार व आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दीपाली भोयर, विकासगंगा समाजसेवी संस्था व कलकत्ता फाउंडेशनचे कर्मचारी, तसेच सुशीलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथील बी.एस.डब्ल्यू. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले व शिबिराच्या नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय योगदान दिले. शिबीराचे संचालन व आभार प्रदर्शन चंदन मासरकर यांनी व्यक्त केले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular