Thursday, April 16, 2026
HomeHealthदिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी द्वारा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला पाच व्हीलचेअर

दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी द्वारा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला पाच व्हीलचेअर

Five wheelchairs donated to Government Medical College and Hospital by Divyang Kaushal Vikas Multipurpose Society

*दिव्यांगा कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी कडून शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला पाच व्हीलचेअर

चंद्रपूर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूरला दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूर कडून ५ व्हील चेअर देणगी रूपात नुकतेच प्राप्त झाले. Five wheelchairs donated to Government Medical College

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, क्षयरोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. भडके, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित प्रेमचंद, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, शरीररचनाशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुलेश चांदेकर तसेच दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी चे अध्यक्ष श्री निलेश पाझारे मंचावर उपस्थित होते. या सर्वांचे उपस्थितीत वॉर्ड परिसेविका यांचेकडे व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे यांनी निलेश पाझारे यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देऊन त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व दिव्यांग बांधवांसाठी करत असलेल्या कार्याची ओळख करून देऊन रुग्णालयात व्हीलचेअर चे असलेले महत्त्व विषद केले. Divyang Kaushal Vikas Multipurpose Society

याप्रसंगी अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे यांनी आपल्या मनोगतनातून रुग्ण हित समोर ठेवून पाच व्हीलचेअर देणगी रूपात दिल्याबद्दल दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटी चे अध्यक्ष निलेश पाझारे यांचे आभार मानले व या व्हीलचेअर आरोग्य सेवा देताना खूपच महत्त्वाच्या असल्याचे बोलले.

याप्रसंगी निलेश पाझारे यांनी रुग्णालयातील व्हीलचेअर ची गरज ओळखून व्हीलचेअर देणगी स्वरूपात देत असल्यामुळे आनंद होत असून यापुढेही आपण छोट्या मोठ्या रुग्ण उपयोगी वस्तू देणगी म्हणून देत राहू असे आश्वस्त केले.

देणगी स्वरूपात व्हील चेअर मिळण्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ निवृत्ती जीवने यांचे मार्गदर्शनाखाली समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे यांनी निलेश पाझारे यांच्याशी संपर्क साधून देणगी स्वरूपात पाच व्हीलचेअर प्राप्त करून देण्यात आल्या.

शहरातील दानशूर संस्था व दानशूर व्यक्ती यांनी रुग्ण हित समोर ठेवून सामाजिक उत्तरदायित्वासाठी पुढे यावे असे आवाहन याप्रसंगी मान्यवरांकडून तसेच समाजसेवा विभागाकडून करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवा अधीक्षक तानाजी शिंदे, तर मान्यवरांचे आभार समाजसेवा अधीक्षक उमेश आडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजसेवा अधीक्षक सर्व भास्कर झळके, राकेश शेंडे, उमेश आडे, हेमंत भोयर, भूषण बारापात्रे, तानाजी शिंदे, मिलिंद बहादे, नागेश मेश्राम, सचिन सहारे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने अधीपरिचारिका, परिसेविका उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular