Thursday, October 30, 2025
HomeAccidentराजुरा - गडचांदूर मार्गावरील कापणगाव येथे भीषण अपघात

राजुरा – गडचांदूर मार्गावरील कापणगाव येथे भीषण अपघात

Fatal accident at Kapangaon on Rajura-Gadchandur road

चंद्रपूर :- राजुरा-गडचांदूर मार्गावरील कापणगाव येथे झालेल्या भीषण अपघातात हायवा ट्रकने ऑटोला दिलेल्या धडकेत ६ निष्पाप नागरिकांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. Fatal accident at Kapangaon, Haywa truck hits auto झटपट नदीच्या पुलावर धोकादायक भेगा

सदर दुर्घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे धाव घेऊन मृतकांच्या कुटुंबीयांना धीर दिला व जखमींच्या उपचाराबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच रराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ग्रील कंपनीकडुन मृतकांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली.

एवढेच नव्हे तर सुभाषभाऊ धोटे यांनी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत प्रशासनावर संताप व्यक्त करताना म्हटले की, “प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आणि प्रभावी उपाययोजना न केल्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. स्थानिक जनतेमध्ये या निष्काळजीपणाबद्दल तीव्र असंतोष आहे. आता तरी ठोस पावले उचलली नाहीत तर नागरिकांचा आक्रोश उफाळून येईल असा इशारा दिला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular