Eye check-up camp conducted at Yerur through Omat West Limited
चंद्रपूर :- निरोगी जीवनमान हि प्राथमिकता आज समाजाची आहे. परंतु ग्रामीण भागातील नागरिक विविध परिस्थिती मुळे या आरोग्य सेवांपासून वंचित असतात. समाजातील प्रत्येक घटक हा निरोगी व सुदृढ असावा यासाठी अनेक स्तरावरून प्रयत्न होत असतो. असाच एक यशस्वी प्रयत्न ओमॅट वेस्ट लिमिटेड (श्री सिद्धबली इस्पात लिमिटेड) च्या माध्यमातून येरुर येथे नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सामाजिक दायित्व निभावणे हि उद्योगांची नैतिकता आहे. या नैतिक मूल्यांच्या आधारावर या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाप्रबंधक रवि चावरे यांनी यावेळी दिली. Eye check-up camp conducted at Yerur through Omat West Limited
येरुर येथे संपन्न या नेत्र तपासणी शिबिराला जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे यांच्या नेतृत्वात नेत्र शल्य चिकित्सक डॉ. वंदेश शेंडे, नेत्र चिकित्सा अधिकारी सुधाकर पेंदाम, शुभम मोरे, अनिल धस, स्टाफ नर्स प्रविणा आसुटकर, मीनाक्षी बोढे, कक्षसेवक पांडुरंग नप्ते व समुपदेशक शिबीर समन्वयक रामेश्वर बागडे यांनी सेवा दिली.
सदर नेत्र तपासणी शिबीर हे उद्योगाच्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग आहे. पुण्यरूपी कार्य म्हणून आम्ही हे शिबीर आयोजित केले असून ग्रामस्थांनी आपल्या उत्स्फूर्त सहभागाने या शिबिराला यशस्वी केले याचा आनंद आहे. आरोग्य तसेच इतर क्षेत्रातील सामाजिक जबाबदारी निभावण्याची हि प्रथा ओमॅट वेस्ट लिमिटेड च्या माध्यमातून निरंतर सुरु राहील अशी ग्वाही यावेळी प्लांट हेड अविनाश डोंगरे यांनी व्यक्त केली. उद्योगाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल यावेळी दोन्ही गांवातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या नेत्र तपासणी शिबिराला ओमॅट वेस्ट लिमिटेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी ॠिषभ मित्तल, येरुर च्या सरपंचा प्रियंका मडावी, येरुर उपसरपंचा सुनीता वडस्कर, विजय बल्की, रमेश बुच्चे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर नेत्र तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी महाप्रबंधक अमरेंद्र सिंह ठाकूर, मनीष वडस्कर, सतीश मूलकलवार, मानव संसाधन विभाग प्रमुख अभय सिंह, प्रशासन विभाग प्रमुख दिपक पराळे, विजय कनोजे, आनंद मिश्रा, स्वप्नील देशमुख, समीर पॉल यांनी विशेष प्रयत्न केले.
