Establishment of Teacher-Parent Association at Infant Convent
चंद्रपूर :- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे शिक्षक आणि पालक यांची सहविचार सभा घेऊन शिक्षक-पालक संघाची स्थापना करण्यात आली. यात शिक्षक-पालक संघाचे परस्पर संवाद कायम ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काम करण्याचा संकल्प घेण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक अभिजीत धोटे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सी बी एस इ शाळेकडून शिक्षक- पालक संघाच्या अध्यक्षपदी मंजुषा अलोने आणि स्टेट शाळेकडून शिक्षक- पालक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू , मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच पालक वर्गा कडून शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्षपदी बंडू ताजने, शाळेतील प्रत्येक वर्गाकडून एक एक पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मजहर शेख यांनी केले. सूत्रसंचालन ज्योस्ना टेकाम मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.