Thursday, October 30, 2025
HomeAccidentवादळाचा जबर तडाखा, झाडे कोसळली, पत्रे हवेत उडाली; विदयूत खांब वाकले, विदयूततारा...

वादळाचा जबर तडाखा, झाडे कोसळली, पत्रे हवेत उडाली; विदयूत खांब वाकले, विदयूततारा तुटल्या

The storm hit hard, trees fell, electricity poles bent, electricity wires broke

वादळाचा जबर तडाखा, झाडे कोसळली, पत्रे हवेत उडाली; विदयूत खांब वाकले, विदयूततारा तुटल्या, महावितरणचे लाखोंचे नुकसान

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हयात दि. 9 जून 2025 व 10 जून 2025 सलग दोन दिवस आलेल्या पावसाने, वारा, वादळाने जनजीवन प्रभावीत झाले. चंद्रपुर जिल्ह्यातील अनेक गावात/शहरात वारा, वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाला. दोन दिवस झालेल्या पावसाने, वारा, वादळाने चंद्रपुर जिल्हयातील व ग्रामीण भागातील मोठे झाडे लाईनवर पडल्याने महावितरणचे एच.टी. पोल 165, एल.टी. पोल 547, एच.टी. लाईन कंडक्टर 20 किमी. पर्यंत तुटले, एल.टी. लाईन कंडक्टर 42 किमी. पर्यंत तुटले. एकूण 35 रोहित्रे बंद पडले. एकंदरीत महावितरणचे 63 लाखाच्या जवळपास नुकसान झाले. Electrical poles bent, electrical wires broken, MSEDCL suffers losses worth lakhs

पाऊस, वारा, वादळ यामुळे शहरातील/गावातील दोन दिवस झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे महावितरणचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

अशा ही परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता वीज कर्मचाऱ्यांनी अनेक चंद्रपूर शहरातील/गावातील खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला,  33 के.व्ही. विद्युत वाहिनीवर वादळी वाऱ्यामुळे मोठे झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत वाहिनीवर अहोरात्र/रात्रंदिवस काम करून विद्युत वाहिनी सुरू केली.

वरील दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता ठिकठिकाणी युद्ध पातळीवर महावितरणचे जनमित्र काम करीत होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular