Tuesday, May 12, 2026
HomeCrimeवरवट शिवारात हातभट्टीवर दुर्गापूर पोलिसांची धाड

वरवट शिवारात हातभट्टीवर दुर्गापूर पोलिसांची धाड

Durgapur Police Raid Illicit Liquor Distillery in Varvat Farmlands

चंद्रपूर :- दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा वरवट येथील शेतशिवारात झुडपी जंगलातील नाल्यालगत अवैधरित्या हातभट्टी लावून मोहफुलाची गावठी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई करत तब्बल १ लाख १५ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Durgapur Police Raid Illicit Liquor

उकनी खाण दुर्घटना…, खासदारांकडून पाहणी…….

या प्रकरणी धनराज धर्मदेव खोब्रागडे याच्याविरुद्ध दुर्गापूर पोलीस ठाण्यात अप. क्र. 260/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ब), (क), (इ), (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई दि. ९ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजताच्या दरम्यान मौजा वरवट येथील जंगल परिसरातील नाल्यालगत करण्यात आली. त्यानंतर दुपारी २.५० वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

राष्ट्रीय लोक अदालती मध्ये 1067 प्रकरणे निकाली…..

कारवाईदरम्यान पोलिसांनी १३ प्लास्टिक ड्रममध्ये साठवून ठेवलेला सुमारे ६५० किलो मोहफुलाचा सडवा, ४९ लिटर गावठी दारू, दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी व प्लास्टिक ड्रम, प्लास्टिक कॅन, टिनाचे पिपे, लाकडी चाटू तसेच प्लास्टिक पाईप असा एकूण १,१५,६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चंद्रपुरातील युवकांना जर्मनीमध्ये करियरची संधी…….

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, परी.पोलीस अधीक्षक कायंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या नेतृत्वात पो. उपनिरीक्षक पंकज वासाडे, पो. उपनिरीक्षक बिंकालवार, महिला पोलीस हवालदार राणी, पोलीस अंमलदार संदीप जाधव, मंगेश शेंडे, रुपेश सावे आदी पोलिस पथकाने पार पाडली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular