Tuesday, March 25, 2025
HomeMaharashtraशासकीय कार्यालयात दारू पिऊन येणे, पत्ते खेळण्याचे प्रकार वाढले

शासकीय कार्यालयात दारू पिऊन येणे, पत्ते खेळण्याचे प्रकार वाढले

Drunkenness in Govt Offices, Card Playing on the Rise

चंद्रपूर :- देशात तरुणांनी दारू पिऊ नये, व्यसनाधीन होऊ नये म्हणून दारूबंदी किंवा अनेक उपक्रम राबवले जातात. कोरोना काळानंतर महाविकास आघाडी सरकारने महसूल वाढावा याकरिता जागोजागी बियर शॉपी सुरु करण्याचे धोरण अवलंबिले. परिणामी आता दारू हि सुकर झाली असून वैध व अवैध मार्गाने सर्वत्र उपलब्ध आहे. शासनाला दारू पासून किती महसूल मिळतोय हा भाग वेगळा मात्र सरकारी कर्मचारीच कार्यालयात दारू पिऊन कर्तव्य बजावत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. कोरपना पंचायत समिती कार्यालयात अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असताना एका बार मध्ये प्याला घेतल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या.

गोंडपिपरी, राजुरा व जिवती तालुक्यातील सरकारी कार्यालयात सुद्धा अशीच परिस्थिती आहे. जिवती तालुक्यात ९० टक्के कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. वीज बिल थकवल्यास वीज कापण्यात सामान्य लोकांना कायदा शिकवत हयगय करत नसणारे महावितरण चे कर्मचारी सामान्य लोकांचे वीज कनेक्शन कापून टाकतात, हा नित्याचाच प्रकार. व नंतर हेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात बसून पत्त्याचा डाव मांडल्याचे व्हिडीओ सुद्धा मध्यन्तरी समाज माध्यमावर झळकले होते.

एकीकडे सर्वसामान्य नागरिक कामानिमित्य कार्यालयात जा-ये करत चपला झिझवत आहेत तर दुसरी कडे सरकारी नोकरीचा माज आलेले काही अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्यांना वेठीस धरून कार्यालयात दारू पिऊन येणे, पत्ते खेळणे, टाईमपास करणे असले प्रकार करत असून तुमचे सरकार असल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सक्षम ठरत नसेल तर आम्ही असल्या कर्मचाऱ्यांचे ”थोबाड” रंगविण्यात मात्र सक्षम आहोत असा सज्जड इशारा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे Bhushan Fuse यांनी उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis याना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.

अश्या स्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने शासनच जबाबदार असल्याचाही इशारा भूषण फुसे यांनी दिला आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular