Saturday, January 18, 2025
HomeAssembly Electionनिवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

District administration ready for election process – District Collector Vinay Gowda

चंद्रपूर :- येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. जिल्ह्यात खुल्या, मुक्त, नि:स्पक्ष वातावरणात अतिशय पारदर्शक पध्दतीने निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द असून यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केला. District administration ready for election process

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी 3 ने वाढली होती, असे सांगून जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गौडा म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ही टक्केवारी आणखी वाढण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सायकल रॅली, रन फॉर व्होट, पोस्टर्स, रिल्स, निबंध, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धासुध्दा आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील दिव्यांग मतदार तसेच ज्येष्ठ मतदारांच्या मदतीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मुलभूत सुविधा पुरविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. Assembly General Elections – 2024

*जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ईव्हीएम :* जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएमचा उपयोग होणार आहे. जिल्ह्यात अतिरिक्त ईव्हीएम असून कुठेही कमतरता नाही. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील एकूण 2077 मतदान केंद्राकरीता 3808 बॅलेट युनीट, 2490 कंट्रोल युनीट आणि 2678 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहे.

*अतिशय पारदर्शक पध्दतीने ईव्हीएमची तपासणी :* जिल्ह्यात आलेल्या ईव्हीएम कडक सुरक्षा बंदोबस्तात स्ट्राँग रुममध्ये ठेवल्या जातात. 24 बाय 7 येथे सुरक्षेचे कवच असून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोरच स्ट्राँग रुम उघडली जाते. त्यातही स्ट्राँग रुमसाठी डबल लॉक सिस्टीम असल्यामुळे कोणताही हस्तक्षेप होण्याचा प्रश्नच येत नाही. ईव्हीएमच्या तपासणीवेळी संबंधित कंपनीचे अभियंते बाहेरून येतात. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोरच पारदर्शक पध्दतीने तपासणी केली जाते.

*आतापर्यंत जिल्ह्यात 2 कोटी 90 लक्षाची जप्ती :* आदर्श आचारसंहितेची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असून जिल्ह्यात आतापर्यंत रोकड, दारू, ड्रग्ज व इतर बाबी मिळून एकूण 2 कोटी 90 लक्ष रुपये / वस्तुंची जप्ती करण्यात आली आहे. यात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 16 लक्ष 30 हजार, ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 54 लक्ष 39 हजार, चंद्रपूर मध्ये 43 लक्ष, चिमूर 19 लक्ष 88 हजार, राजुरा 24 लक्ष 67 हजार आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात 1 कोटी 32 लक्षाची जप्ती करण्यात आली आहे.

*असे आहेत जिल्ह्यातील एकूण मतदार :* चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ असून यात 70- राजुरा, 71 –चंद्रपूर, 72 –बल्लारपूर, 73 –ब्रह्मपुरी, 74 -चिमूर आणि 75 वरोरा या मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 18 लक्ष 50 हजार 102 मतदार असून यात पुरुष मतदार 9 लक्ष 39 हजार 115, स्त्री मतदार 9 लक्ष 10 हजार 939, इतर 48 मतदारांचा समावेश आहे. राजूरा विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 167895, स्त्री मतदार – 157381, इतर 2, एकूण – 325278), चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 188724, स्त्री मतदार – 185168, इतर 35, एकूण – 373927), बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 158628, स्त्री मतदार – 153720, इतर 7, एकूण – 312355), ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 137752, स्त्री मतदार – 137914 एकूण – 275666), चिमूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 141153, स्त्री मतदार – 139674, एकूण – 280827), आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 144963, स्त्री मतदार – 137082, इतर 4, एकूण – 282049)

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular