Thursday, October 30, 2025
HomeAccidentनागरिकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

नागरिकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Citizens learn disaster management lessons through training

चंद्रपूर :- पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थिती व इतर आपत्ती वेळी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच चंद्रपूर तालुका प्रशासनाच्या वतीने लोहारा येथील तलावावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. Citizens learn disaster management lessons through training

या प्रशिक्षणाला अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी नागरिकांना सीपीआर, नैसर्गिक आपत्तीमध्ये घ्यावयाची दक्षता याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन दलातर्फे प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.

सदर प्रशिक्षणाचा लाभ गावातील नागरीक तसेच तालुक्यातील पोलीस पाटील, इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामसेवक, कृषी सहायक, आशा सेविका, आपदा मित्र, आपदा सखी, पट्टीचे पोहणारे नागरिक यांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख व त्यांच्या टीमने सहकार्य केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular