Tuesday, June 9, 2026
HomeEducationalधर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार

Agitation to continue until Union Education Minister Dharmendra Pradhan resigns.

युवकांच्या प्रश्नांवर निर्णायक लढा उभारणार : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार — कपिल ढोके

चंद्रपूर ग्रामीण युवक काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात ; संघटन बळकटीकरणासह NEET प्रकरणाविरोधात मशाल मोर्चाचे नियोजन.

चंद्रपूर :- युवक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे लढण्यासाठी युवक काँग्रेस कटिबद्ध असून, NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत युवक काँग्रेसचा संघर्ष सुरू राहील, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रभारी कपिल ढोके यांनी दिला.

चंद्रपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक यंग रेस्टारंट, चंद्रपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कपिल ढोके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत युवक काँग्रेसच्या संघटनात्मक विस्ताराबरोबरच युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीत चंद्रपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंतनु धोटे यांनी जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांचा सविस्तर आढावा सादर केला. युवक काँग्रेस सत्ताधाऱ्यांच्या जनविरोधी धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास सक्षम असून, युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा उभारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव तथा चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रभारी केतन रेवतकर आणि प्रदेश महासचिव रमिझ शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यावर भर देण्यात आला. जिल्ह्यातील रिक्त पदांची तातडीने भरती, जिल्हा कार्यकारिणीचे पुनर्गठन, तसेच विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा कार्यकारिणींची पुनर्रचना याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

आगामी काळात युवक काँग्रेसची संघटना अधिक सक्षम व गतिमान करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ जिल्हाभर मशाल मोर्चा काढण्याचे नियोजनही बैठकीत करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क, वाढती बेरोजगारी, महागाई आणि युवकांवरील अन्याय या प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मार्गदर्शन करताना कपिल ढोके म्हणाले, बेरोजगारी, शिक्षणातील भ्रष्टाचार, महागाई आणि युवकांवरील अन्यायाविरोधात युवक काँग्रेसने सातत्याने संघर्ष करत राहिले पाहिजे. युवकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा उभारणे ही काळाची गरज आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि भूमिका घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटना अधिक मजबूत करणे आवश्यक आहे.

या बैठकीला चिमूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत ढवळे, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश गोनेलवार, ब्रह्मपुरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर नाकतोडे, वरोरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शुभम चिमूरकर यांच्यासह प्रफुल आसूटकर, प्रदीप घागी, नरेश बुरांडे, सुमित आरेकर, हेमंत आरेकर, इरशाद शेख, विपीन पेद्दुलवार, रोशन मरापे, प्रेम बोंडे, अमोल कांबळे, नागेंद्र चट्टे, नितीन दुवावार, किशोर कारडे, अभिजित मुपीडवार, हर्षल येलमुले, नरेश आनंद, मंगेश बावणे, संदीप टोंगे, नितीन सोयाम, रवींद्र करमणकर, माधव वर्मा, शोहेब शेख, सौरभ टिपले, कुणाल सावे, रोहित मातंगी, संकेत नंदुरकर, रितिक शेंडे, बंटी भांगडिया, जीशान कुरेशी, अल्तमश शेख, पवन निलंमवार, उदय बोबडे, सचिन गेडाम, अमोल उईके, गौतम पाटील, गजानन वाघमारे, आशिष उमरे, उत्सव भगत यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular