Thursday, October 30, 2025
HomeAccidentझरपट नदीच्या पुलियावर धोकादायक भेगा

झरपट नदीच्या पुलियावर धोकादायक भेगा

Dangerous crack on the culvert of the Zarpat river near Hanuman Khidki

चंद्रपूर :- शहरातील ऐतिहासिक हनुमान खिडकी मार्गावर असलेला झरपट नदीवरील पुलिया मोठ्या धोक्याच्या स्थितीत आला आहे. सततच्या पावसामुळे पुलियावर चार ते पाच फूट खोल भेगा पडल्या असून एका बाजूने संपूर्ण संरचना खालच्या बाजूस दबली आहे. तरीसुद्धा नागरिक व दोन, तीन चाकी वाहनांची ये-जा सुरूच असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Dangerous crack on the culvert of the Zarpat river

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष (जनहित व विधी) पियूष धुपे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुलियाचे तातडीने रिपेअरिंग अथवा आवश्यक असल्यास नवीन उंच व दर्जेदार पुलिया बांधण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन उभारले जाईल असा इशाराही देण्यात आला. MNS demands immediate repair before an accident occurs

निवेदन देताना शहर अध्यक्ष पियूष धुपे यांच्यासोबत जनहित जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ गुढे, रमेशभाऊ काळबांडे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ कुकडे, विजय तुर्क्याला, शहर उपाध्यक्ष कैलाश वलकोंडे, आशु वाळके, संघर्ष कांबळे, आकाश भोयर आदींसह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular