Cruiser to run through city soon for Tadoba Safari
चंद्रपूर :- शहरातील पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सफारीसाठी Tadoba Tiger Safari थेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच क्रुझर सेवा सुरू होणार आहे. महिन्याभरात ही सेवा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत वन विभागाच्या कार्यालयात बैठक घेतली आहे. विशेष म्हणजे मुंबई येथे वन मंत्री गणेश नाईक Forest Minister Ganesh Naik यांची भेट घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर मागणी केली होती. तर गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. Cruiser to run through city soon for Tadoba Safari
या बैठकीला बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली संचालक, अशोक खडसे संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला, एफडीसीएम चंद्रपूर प्रदेश प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोरचे उपसंचालक आनंद रेड्डी येल्लू, मध्य-चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोडू, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे, विभागीय वनअधिकारी सचिन शिंदे आदिंची उपस्थिती होती.
ताडोबा Tadoba Tiger Project हे देशभर प्रसिद्ध असलेले व्याघ्र प्रकल्प असून, येथे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मात्र, चंद्रपूर शहरातून ताडोबाला जाण्यासाठी थेट सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर क्रुझर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार जोरगेवार यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर मांडला होता.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आमदार जोरगेवार यांनी वन विभागाच्या अधिकार्यांसोबत बैठक घेत स्कूझर सेवेच्या Cruiser Service अंमलबजावणीसाठी आवश्यक कार्यवाहीबाबत चर्चा केली. या बैठकीत क्रुझरच्या मार्गाची, वेळापत्रक, तिकीट दर, बुकिंग व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबींवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
क्रुझर सेवा सुरू झाल्यास पर्यटकांना शहरातून ताडोबाला जाण्यासाठी सुविधा मिळणार आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून, पर्यटकांना प्रवासासाठी सहज सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ताडोबाला भेट देणार्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक व्यवसायालाही चालना मिळणार आहे.
यासंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, “ताडोबा हा चंद्रपूरच्या पर्यटन क्षेत्रातील एक महत्त्वाचा ठिकाण आहे. पर्यटकांना अधिक सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्कूझर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सेवा महिन्याभरात सुरू होईल. वन विभागाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून, महिन्याभरात ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने अंतिम तयारीला वेग देण्यात आला असल्याचे ते म्हणाले. सोबत बुकिंग करुन वेळेवर न येणा-या पर्यटकांच्या ठिकाणी दुस-या पर्यटकांना ताडोबा सफारी दिली जाणार आहे, संजय सब्बनवार यांनी तयार केलेली 40×40 फूट लांबीची गोंडकालीन किल्ल्याची लघुप्रतिकृती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ठेवली जाणार आहे. तर दिवंगत ख्यातनाम काष्ठशिल्पकार मनोहर सप्रे यांनी बांबूपासून साकारलेले काष्ठशिल्पांसाठी वन विभागाद्वारे प्रदर्शनी दालन उभारून दिल्या जाणार आहे. आदी निर्णय सदर बैठकीत घेण्यात आले आहे.
