Under-construction national highway is becoming deadly
निर्मानाधिन राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जिवघेणा : दुचाकी अपघातात माय लेकीचा करुण अंत.
वारंवार होणाऱ्या अपघात व मृत्यूमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष.
चंद्रपूर :- बल्लारपूर – राजुरा दरम्यान निर्मनाधिन राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत राजुरा येथील तरुणी व तिच्या आईचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येथे वारंवार होत असलेल्या अपघात व मृत्यूमुळे परिसरातील नागरिकांत राष्ट्रिय महामार्गाच्या कार्यावर तीव्र रोष व्यक्त होत आहे. Under-construction national highway is becoming deadly
राजुरा येथील पेठ वार्डातील ज्योती बंडू रागीट (42) व त्यांची मुलगी सेजल बंडू रागीट ह्या दोघीही MH 34 BN 5538 क्रमांकाच्या दुचाकीने राजुरा येथुन बल्लारपूर कडे जात असताना वर्धा नदीचा पुल ओलांडल्यावर जलाराम बाप्पा मंदिराजवळ अद्यात ट्रक ने दुचाकीला धडक दिल्याने माय लेकी जागीच ठार झाल्या. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून मृतांचे शव उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. Mother and daughter meet tragic end in bike accident

बामणी – राजुरा ते आदिलाबाद या राष्ट्रिय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सूरू आहे. रस्त्याची उंची वाढविण्याकरीता मातीचे ढिगारे टाकण्यात आले. कुठल्याही प्रकारचे ठोस नियोजन नसल्याने या धिगाऱ्यावरील माती रस्त्यावर येत आहे. पावसात घसरून तर पाऊस नसताना प्रचंड धुळीचे साम्राज्य या ठिकाणी बघायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या पावसात तर भर रस्त्यात चिखल होऊन अनेकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागला. या मार्गावरून नेहमीच प्रवाश्यांना तारेवरची कसरत करावी लागत असुन, वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा अनेकांना प्राणाला मुकावे लागणार असल्याची भिती प्रवाशी व्यक्त करीत आहेत.
 
                                    


