Congress’s Begging Movement in Government Medical Hospital
चंद्रपूर :- ग्रामीण तसेच शहरी भागातील सामान्य नागरीकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागत आहे. या विरोधात भारतीय राष्ट्रीस काँग्रेस कमेटीच्या चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाद्वारा मा.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘भिक मांगो’ Begging Movement आंदोलन करण्यात आले. Congress’s Begging Movement in Chandrapur Government Medical Hospital
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याची बाब अनेक वर्तमान पत्रात प्रसिध्दीस आली. एक्स-रे मशिन सुविधा, एम.आर.आय. सुविधा, सिटी स्कॅन या सुविधा योग्य वेळी मिळत नसल्याने या विरोधात चंद्रपूर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाने भिक मांगो आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले.