Friday, September 18, 2026
HomeCulturalभाजप महानगर कार्यालयात राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस उत्साहात साजरा

भाजप महानगर कार्यालयात राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस उत्साहात साजरा

चंद्रपूर :- भाजप महानगर कार्यालय येथे राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदी भाषेचे महत्त्वतिची समृद्ध साहित्यिक परंपरा आणि दैनंदिन जीवनातील हिंदी भाषेची भूमिका याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. National Hindi Language Day celebrated at the Chandrapur BJP city office

          कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जनता महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या प्राध्यापिका मंजुळा निमकर उपस्थित होत्या. त्यांनी हिंदी भाषेचा इतिहासतिचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व तसेच राष्ट्राच्या एकात्मतेमध्ये हिंदी भाषेची भूमिका याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

           हिंदी ही देशातील विविध भागांना जोडणारी महत्त्वाची भाषा असूनतिच्या संवर्धनासाठी आणि प्रचार-प्रसारासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदी भाषेच्या माध्यमातून साहित्यसंस्कृती आणि विचारांची देवाणघेवाण अधिक व्यापक पद्धतीने होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

          यावेळी  महामंत्री रवि गुरनुलेसविता दंढारेभाजप नेते अड. सुरेश तालेवारअनु. जाती अध्यक्ष विमल काटकरअल्पसंख्याक अध्यक्ष कौसर खानकामगार झोपडपट्टी अध्यक्ष रामकुमार आक्कापेल्लीवारविध्यार्थी आघाडी अध्यक्ष प्रलय म्हशाखेत्रीशिक्षिका वैशाली मद्दीवारउजमा शेखयांच्यासह भाजप पदाधिकारीकार्यकर्ते तसेच हिंदीप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.

उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमातून हिंदी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular