Congress Dr. Babasaheb Ambedkar Samman Morcha organized in Chandrapur
चंद्रपूर :- भारतीय राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय संसदेत विशेष चर्चा सुरू असताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भर संसदेत आक्षेपार्ह विधान करून त्यांचा घोर अपमान केला असून देशातील जनमानसाच्या भावना दुखावल्या आहेत. याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वतःहून द्यावा अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषदेत केली. Congress Dr. Babasaheb Ambedkar Samman Morcha
केंद्र व राज्य सरकार च्या निष्क्रियतेमुळे देशात व राज्यात गुंडाराज वाढला आहे, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, भाजपच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावर हल्ला होत आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेला संरक्षण देण्यात अयशस्वी ठरले आहे असा आरोप चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी पत्रकार परिषदेत केला. Govt’s inaction has increased the country and the state – Congress District President Subhash Dhote
ते पुढे म्हणाले की, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या मनोविकृत समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, परभणीतील वडार समाजातील भीमसैनिक – सोमनाथ सुर्यवंशी यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही पोलीस कोठडीतील संशयास्पद मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,
बिड जिल्हातील मस्साजोग गाव चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणी राज्याचे नवनिर्वाचित मंत्र्याच्या निकटवर्तीयावर संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,
मुंबई येथे काँग्रेस कार्यालयावर भाजप च्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. महिला कर्मचाऱ्यावर हात उचलण्यात आले. कल्याणमध्ये मराठी माणसावर गुंड पाठवून हल्ला करण्यात आला. दिवसा ढवळ्या महाराष्ट्रात चक्क मराठी माणसांवर परप्रांतीयांकडून हल्ले होत असून राज्यात दहशत निर्माण होत आहे. राज्यात वर्षभरात ४५ हजार महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था पुर्णपणे बिघडलेली आहे. हे सरकार मंत्रिमंडळातील नेत्यांचा, पोलिसांचा बचाव करीत जनतेवर अन्याय करीत आहेत.
एवढेच नव्हे तर देशातील जनतेने वारंवार मागणी करूनही जातीय जनगणना करण्यास व इव्हिएम मशीन ऐवजी बॅलेट पेपर वर निवडणूका घेण्यास भाजपप्रणित सरकार टाळाटाळ करीत आहे.
राज्यात सोयाबीन, कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. खोट्या योजना व खोट्या आश्वासनाने सत्तेत आलेले हे सरकार जनतेवर होणारा अन्याय दूर करण्यात पुर्णपणे अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे कायद्याच्या या राज्यात संविधानाची उघड उघड पायमल्ली करून, गुंडाराज, अराजकता निर्माण होत असतांना केंद्र आणि राज्य सरकार मुग गिळून गप्प बसले आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
त्यामुळे वरील सर्व घटनाक्रम लक्षात घेता दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चाचे आयोजन चंद्रपूर येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.
यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, आजी माजी खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, जिल्ह्यातील सर्व आघाडी संघटना, सेल व विभाग यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिह गौर, विनायक बांगडे, विनोद दत्तात्रय, नंदु नागरकर, केशव रामटेके, अंबिकाप्रसाद दवे, प्रवीण पडवेकर, घनश्याम मुलचंदांनी, गोपाल अमृतकर यांचेसह अनेक मान्यवर उपस्थीत होते.