Friday, October 31, 2025
HomeAccidentचंद्रपूर महावितरणच्या कर्मचाऱ्यांची मॅरेथॉन - 'रन फॉर सेफ्टी''

चंद्रपूर महावितरणच्या कर्मचाऱ्यांची मॅरेथॉन – ‘रन फॉर सेफ्टी”

Chandrapur MSEDCL employees’ marathon for awareness of electricity consumers – ‘Run for Safety’

चंद्रपूर :- वीज ग्राहकांत वीज अपघातांबाबत जागरूकता निर्माण व्हावी, वीज अपघातांचे प्रमाण शून्यावर यावे म्हणून महावितरणने मॅरेथॉन – ‘रन फॉर सेफ्टी’चे Marathon Run For Safety आयोजन केले होते.

प्रथम चंद्रपूरचे मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे, संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ, श्री.कोलते विद्युत निरीक्षक चंद्रपूर, यांच्या हस्ते या मॅरेथॉन – ‘रन फॉर सेफ्टी’ ला झेंडा दाखवून सुरुवात झाली. Chandrapur MSEDCL Employees Marathon ‘Run for Safety’

दि. 01 जून 2025 या मॅरेथॉन – ‘रन फॉर सेफ्टी’ ला चंद्रपूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे, चंद्रपूर मंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे,जिल्हा विद्युत निरीक्षक श्री.कोलते,व सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं.) श्री.सुशिल विखार, आणि श्री.विशाल पिपरे उपमुख्य औधोगिक संबंध अधिकारी तसेच कार्यकारी अभियंते सर्वश्री.दारव्हेकर, पेगलपट्टी, वंदिले, शहाडे, निचत(चाचणी विभाग), श्री.गणेश चाचेरकर, जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शुन्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे ब्रिद घेऊन चंद्रपूर महावितरणच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात दि.१ ते ६ जून २०२५ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून चंद्रपूर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी चंद्रपूर परिमंडळ मुख्यालय बाबूपेठ ते आझाद गार्डन शहरात व परत मुख्यालय बाबूपेठ पर्यंत धावले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी वीज सुरक्षेचे संदेश देणारे फलक हातात पकडले होते तसेच वीज सुरक्षेबाबत विविध घोषणाही देण्यात आल्या.

‘विद्युत भवन’ या परिमंडल कार्यालयात आल्यानंतर मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे व संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ, श्री.कोलते विद्युत निरीक्षक चंद्रपूर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना वीज सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular