चंद्रपूर :- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये आज बहुजन समाज पक्षाच्या प्रचाराला प्रचंड उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. बीएसपीचे उमेदवार अनिल रामटेके यांच्या नेतृत्वात इप्सीबाराणी अंजया दोम्मट व रजत मसराम या तीन उमेदवारांनी संयुक्तपणे भव्यदिव्य बाइक रॅली काढण्यात आली. ‘हत्ती नही गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है’ या जोशपूर्ण नाऱ्यांनी संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग अक्षरशः दुमदुमून गेला. BSP Bike Rally
ही रॅली पाहता जणू विजयी मिरवणूकच निघाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. शेकडो युवकांनी आपल्या दुचाकींवर बहुजन समाज पक्षाचे झेंडे फडकावत रॅलीत सहभाग नोंदवला. “अनिल भाऊ आगे बढो, इप्सीबाराणी आगे बढो, रजत भाऊ आगे बढो”, “बीएसपी जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर भारावून गेला. Chandrapur Municipal Corporation Election 2026
रॅलीदरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उमेदवारांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी नागरिकांनी हात हलवून व जल्लोष करत रॅलीला प्रतिसाद दिला. विशेषतः तरुणाईचा उत्साह पाहता बीएसपीच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
बाइक रॅलीच्या दरम्यान तीनही उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत, बहुजन समाज पक्षाच्या विचारांना व विकासाच्या अजेंड्याला भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले.
“प्रभागातील मूलभूत सुविधा, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांचा आवाज महापालिकेत बुलंद करण्यासाठी बीएसपीला संधी द्या,” असे आवाहन उमेदवारांनी केले.