Friday, October 31, 2025
HomeAgricultureआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरूवात

Due to the follow-up of MLA Sudhir Mungantiwar, bonuses have started being deposited in the accounts of paddy farmers

चंद्रपूर :- शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव अग्रेसर असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे,चंद्रपूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आ. श्री. मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांचे आभार मानले आहेत. bonuses have started being deposited in the accounts of paddy farmers

खरीप हंगाम 2024-25 अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत सहभागी झालेल्या नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील पणन अधिकारी विभागाकडे 69 कोटी रूपये तर आदिवासी विकास महामंडळाकडे 25 कोटी रूपये धान बोनस जमा झालेला असुन पाहिल्या टप्प्यातील एकूण 94 कोटी रूपये शेतकऱ्यांच्या थेट पैसे खात्यात धानाच बोनस जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांना लवकरच बोनस मिळणार आहे.यासाठी चंद्रपूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

राज्य शासनाने धान लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रानुसार, प्रती हेक्टर वीस हजार रुपयांचा प्रोत्साहनपर बोनस देण्याचा शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत रेटून धरली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने यासंदर्भात निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

विशेष म्हणजे, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो वा नसो, तरीही शेतकऱ्यांना ही प्रोत्साहनपर रक्कम दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जावी, अशी मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली होती. ती देखील राज्य शासनाने मान्य करून तसा निर्णय जाहीर केला होता.

या निर्णयामागे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विधानसभेतील मागणी महत्त्वाची ठरली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अन्न व नागरी पुरवठा विभागाने 25 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात हा बोनस जमा होण्याची सुरुवात झाली आहे. राज्यभरातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

*कायम शेतकऱ्यांप्रती संवेदनशील*

आ.मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटीची रक्कम मिळू शकली होती. यापूर्वीही धानाच्या बोनससाठी पाठपुरावा करत बोनस मिळवून दिला होता. शेतकऱ्यांप्रती आ. मुनगंटीवार सदैव संवेदनशील असतात, हे विशेष.

मुख्यमंत्र्यांसोबत केली होती चर्चा

राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस CM Devendra Fadanvis यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा केली होती. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळाला तर शेतकऱ्यांचे मनोबल वाढेल, याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष बोनस देखील जमा होण्याची सुरूवात झाली आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular