Wednesday, November 5, 2025
HomeMPगुरू नानकदेव साहेब मानवतावादी संत

गुरू नानकदेव साहेब मानवतावादी संत

Guru Nanakdev Sahib is a humanitarian saint

चंद्रपूर :- संत, समाजसुधारक आणि मानवतेचा संदेश देणारे श्री. गुरू नानकदेवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी रामपूर, राजुरा येथील गुरूद्वारा साहेब येथे उपस्थित राहून दर्शन घेतले व विनम्र अभिवादन करून गुरू नानकदेवजींच्या पवित्र संदेशांचे स्मरण केले. Birth anniversary of GuruNanak Dev Sahib

या प्रसंगी त्यांनी सांगितले की, गुरू नानकदेवजी महाराजांनी समानता, बंधुता, सेवा आणि प्रेम यांचा मानवतावादी जो संदेश दिला, तो आजच्या काळातही समाजाला मार्गदर्शक आहे. त्यांच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी एकमेकांप्रती सद्भावना, दया आणि सेवा वृत्ती जोपासावी, हेच खरे गुरूपरंपरेचे पालन आहे. Guru Nanak Dev Sahib, the humanitarian saint

यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, शहराध्यक्ष माजी नगरसेवक हरजीतसिंग संधु, माजी नगरसेवक सिद्धार्थ पथाडे, माजी नगरसेवक राधेश्याम अडानीया, किशोर रायपुरे, गणेश रेक्कलवार यासह गुरूद्वारा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि श्रद्धाळू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात गुरूवाणी पठण, कीर्तन व लंगराचे आयोजन करण्यात आले होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular