Saturday, January 18, 2025
HomeChief Ministerआर्थिक विकास महामंडळास मंजुरी

आर्थिक विकास महामंडळास मंजुरी

Approval for Economic Development Corporation : Thanks to Hansraj Ahir by Lohar Samaj

चंद्रपूर – महाराष्ट्र लोहार समाज संघटनेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून लोहार समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व रोजगारभिमुख उत्थानाकरिता आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून या समाजाला न्याय देण्याची मागणी करण्यात येत होती. Approval for Economic Development Corporation

मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांच्या निवासस्थानी झालेल्या मायको ओबीसी बैठकी दरम्यान केंद्रीय मंत्री मा भुपेंद्र यादव व राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे विद्यमान अध्यक्ष हंसराज अहीर Hansraj Ahir याच्या उपस्थितीत लोहार समाजाच्या प्रतिनीधी मंडळाद्वारे आर्थिक विकास महामंडळाची मागणी प्रामुख्याने करण्यात आली होती याची दखल घेत सामाजिकदृष्टया संवेदनशील असलेल्या महायुती सरकारने नुकतेच, लोहार समाज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केल्याने चंद्रपूर जिल्हा लोहार समाज संघटनेच्या पदाधिकारी व समाजबांधवांनी हंसराज अहीर याचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. Thanks to Hansraj Ahir by Lohar Community

दिनांक १३ ऑक्टोंबर रोजी हंसराज अहीर यांच्या कार्यालयात जावून समाज बाधवांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचे आभार मानले. लोहार समाजाच्या न्यायोचित मागण्याबाबत हंसराज अहीर यांनी वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. हंसराज अहीर यांनी या योगदानात लोहार संघटनेचे पदाधिकारी व अनेक समाजबांधवांचे परिश्रम असल्याचे सांगितले. लोहार समाजाच्या न्याय मागण्यांप्रती आपण नेहमी प्रयत्नशील राहू असे समाजबांधवांना आश्वासन दिले.

याप्रसंगी मधुकर शेंडे, जितेश मेश्राम, आनंद बावणे, प्रमोद मेश्राम, जमूनादास सोनटक्के, मदन सोनटक्के, वासूदेव शेंडे, राजेश सोनटक्के, उत्तम शेंडे, रवि बावणे, प्रमोद दाभेकर, प्रदीप शिरपूरकर, नागोजी सोनटक्के, विनोद धाबेकर, गोविंदा सोनटक्के, मेघश्याम दाभेकर, उमेश नाचनकर यांचेसह अन्य समाजबांधव उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular