Yellow Alert Issued for Chandrapur District on April 1 and 3; Orange Alert on April 2
चंद्रपूर :- नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक 1 व 3 एप्रिल 2026 रोजी yelo अलर्ट तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 40 ते 50 किमी वेगाने) तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. Yellow Alert Issued for Chandrapur District
तसेच, काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. Citizens Urged to Remain Vigilant
संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्याच्या वेळी घरात सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. खिडक्या व दरवाजांपासून दूर राहावे तसेच सखल भाग, अंडरपास, ड्रेनेज परिसर किंवा पाणी साचणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. खराब दृश्यमानतेमुळे पावसात वाहन चालवणे टाळावे आणि विजेच्या तारांपासून तसेच पॉवर लाईन्सपासून दूर राहावे.
वादळ व विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोकळ्या जागेत असल्यास सुरक्षित इमारतीचा आसरा घ्यावा. उंच झाडाखाली, लोखंडी वस्तूजवळ किंवा तात्पुरत्या शेडमध्ये थांबू नये. घरात असताना विद्युत उपकरणे बंद ठेवावीत, लँडलाईन फोनचा वापर टाळावा तसेच पाण्याच्या संपर्कात येणे टाळावे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, महाकाली यात्रेदरम्यान जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांनीही हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. यात्रेसाठी आलेल्या भक्तांनी निवारा क्षेत्राच्या अधिक माहिती करिता मंदिर परिसरातील नियंत्रण कक्षा भेट देऊन अधिक माहिती घ्यावी.