‘Advanced Stitching Training’ under CSR by Dhariwal Infrastructure Limited
चंद्रपूर :- धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, चंद्रपूर आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने देवेश कुमार (मुख्य महाप्रबंधक धारिवाल) यांच्या मार्गदर्शनात CSR ऑफिस, पडोली येथे ‘एडवांस स्टिचिंग ट्रेनिंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत 9 गावांमधील लाभार्थी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून, कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ‘Advanced Stitching Training’ under CSR by Dhariwal Infrastructure Limited
कार्यक्रमाचे उद्घाटन धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक अतुल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अनीश नायर, धीरज ताटेवार व प्रशिक्षक विश्वास पानघाटे उपस्थित होते.

अतुल गोयल यांनी महिलांना स्वरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले आणि अशा प्रशिक्षणांमधून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपना येरगुडे यांनी केले तर आभारप्रदर्शन माधुरी श्रीवास्तव यांनी केले.
स्थानिक महिलांसाठी स्वरोजगाराच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणून या प्रशिक्षणाचा उल्लेख करण्यात येत आहे.
 
                                    


