Adivasi Day and Revolution Day in excitement at Dhonda Arjuni
चंद्रपूर :- जिवती तालुक्यातील मौजा धोंडा अर्जुनी येथे जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिनानिमित्ताने आदिवासी समाज बांधवांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रॅली काढून आदिवासी महानायक तथा भारतीय क्रांती नायक यांचा जयघोष केला. आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. Adivasi Day and Revolution Day in excitement at Dhonda Arjuni
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, जागतिक आदिवासी दिवस, क्रांती दिन आणि नागपंचमी असा त्रिवेणी संगम आज लाभला असून आपल्या परिसरातील आदिवासी समाज बांधवांनी आदिवासी महानायक वीर बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके तथा अनेक क्रांतीवीरांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून त्यांनी दाखविलेल्या मार्गाने चालत जीवनात प्रगती करावी असे आवाहन केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ काँग्रेस नेते भिमराव पाटील मडावी, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, जिवती नगराध्यक्षा सविताताई टेकाम, माजी सभापती सुग्रीव गोतावळे, महिला तालुकाध्यक्षा नंदाताई मुसने, ताजुद्दीन शेख, श्यामराव पा. कोटणाके, जंगु पा. येडमे, भोज पा. आत्राम, लिलाबाई मडावी, अजगर अली, चंदू वेट्टी, दिवाकर वेट्टी, बाजीराव वलका, गोविंदराव कुमरे, रंजनाताई जुमनाके, नामदेव जुमनाके, परशुराम पांचाळ, किरण पांचाळ, अशपाकभाई, बालाजी कर्ले, अमोल कांबळे, संतोष जाधव, डोईफोडे, शमशुद्दीन यासह जिवती तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.