Looting money, mobile phones at knife point in general hospital
Just some action of Chandrapur city police
चंद्रपूर :- चंद्रपूर सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या नातलगाला भेटायला आलेल्या इसमाला चाकूचा धाक दाखवून, मारहाण करीत जबरजस्तीने खिशातील पैसे व मोबाईल लूटमार करणाऱ्या दोन आरोपी पैकी एक आरोपी शुभम उर्फ बाबू अमर समुंद, वय 28 वर्ष, रा. पंचशील चौक, चंद्रपूर याला शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने DB Squad Chandrapur City Police काही तासातच अटक केली यात वाटमारीतील मोबाईल, पासबुक हस्तगत करण्यात आले आहे. Looting money, mobile phones at knife point in general hospital
साखरवाही येथे राहणारे सुभाष मराठे यांची बहीण सामान्य रुग्णालयात भरती असल्याने तिला पाहण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास भेटण्याकरीता आले असता, रुग्णालय परीसरात अंधारात लघवी करण्यासाठी गेले असता तेथे अचानक दोन अनोळखी मूले तोंडाला काळे दुपट्टे बांधलेले त्यांचेजवळ आलेत त्याचेपैकी एकाने चाकु दाखवून ‘साले पैसे निकाल वरना पेट में चाकु मार दूंगा’ अशी धमकी दिली, त्यामुळे मराठे घाबरले आणी त्याला पैसे नसल्याने सागितले. दुसऱ्या मुलाने मागुन पकडुन पाठीवर व बरगडीवर हाताने बुक्क्या मारून जबरदस्तीने पॅन्ट च्या खिशातील रोख रूपये 11000 रुपये, बँक ऑफ इंडियाचे बैंक पासबुक, एक रियलमी Realme कंपनीचा वापरता मोबाईल काढून पळून गेले. अशी तक्रार चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
चंद्रपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी जिल्हा सामान्य रूग्णालय परीसरातील CCTV सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहणी करून तसेच गोपनीय माहितीवरून आरोपी शुभम उर्फ बांबु अमर समुद, वय 28 वर्षे, रा. पंचशील चौक, घुटकाळा वॉर्ड, चंद्रपूर वास ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेला एक realme कंपनीचा वापरता मोबाईल किंमत 10,000 रुपये, बैंक पासबुक तसेच गुन्हा करतेवेळी वापरलेला चाकु असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीचा साथीदार व उर्वरित रोख रूपये यांचा तपास सुरू आहे. Chandrapurtoday Crime
सदरची कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक, सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे सुचनेप्रमाणे मंगेश भोपांडे स.पो. नि., संतोष निंभोरकर पोउपनि, पोहवा महेद्र बेसरकर, सचिन बोरकर, निलेश मुडे, भावना रामटेके, संतोष पंडीत, इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, शाहबाज, रूपेश रणदिवे, रूपेश पराते, इरशाद, मंगेश मालेकर, राहुल मितोडे गुन्हे शोध पथक, पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांनी केली आहे.
