Saturday, October 17, 2026
HomeForestपळसगावात वाघाचा थरारक हल्ला! शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू

पळसगावात वाघाचा थरारक हल्ला! शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलालगतच्या परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचे संकट पुन्हा एकदा गंभीर बनले असून, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पळसगाव वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उषा अंकुश गुरनुले (वय अंदाजे ४५ वर्षे), रा. पळसगाव, असे मृत महिलेचे नाव आहे. शेतात काम करत असताना वाघाने अचानक हल्ला केल्याने ही हृदयद्रावक घटना घडली. Tiger attacks woman working in a field, dies on the spot

प्राप्त माहितीनुसार, पळसगाव वनपरिक्षेत्रातील पळसगाव वर्तुळाच्या पळसगाव-१ बीटमध्ये श्री. गुरनुले यांच्या शेतात उषा गुरनुले काम करत होत्या. याचवेळी जंगलातून आलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना ओढून नेले. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पळसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतात काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. Tadoba Buffer Zone

घटनेची माहिती मिळताच पळसगाव वनपरिक्षेत्रातील वन अधिकारी, वनपाल आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. शोकाकुल कुटुंबाला दिलासा देण्यासाठी वनविभागातर्फे शासनाच्या नियमानुसार ५० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. नियमानुसार पुढील मदतीची प्रक्रिया करण्यात येणार आहे. Forest Department

वाघाच्या हालचालींवर वनविभागाची नजर

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित परिसरात वन कर्मचाऱ्यांची विशेष गस्त वाढविण्यात आली आहे. वाघाची अचूक ओळख पटविण्यासह त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी वनविभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

शेतकरी आणि ग्रामस्थांना खबरदारीचे आवाहन

जंगलालगत शेती असलेल्या शेतकरी बांधवांनी तसेच ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. शेतात काम करण्यासाठी किंवा पिकांना पाणी देण्यासाठी जाताना शक्यतो एकट्याने न जाता समूहाने जावे. सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा अंधाराच्या वेळी जंगलालगतच्या परिसरात जाणे टाळावे. वन्यप्राण्यांच्या हालचाली आढळल्यास त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular