Thursday, October 15, 2026
HomeCulturalचांदीच्या मातेच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेने महाकाली महोत्सवाला प्रारंभ

चांदीच्या मातेच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेने महाकाली महोत्सवाला प्रारंभ

चंद्रपूर :- चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या माता महाकालीच्या भक्तिमय वातावरणात श्री माता महाकाली महोत्सवाला आज, गुरुवारी प्रारंभ होणार आहे. चांदीच्या मातेच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करून महोत्सवाची सुरुवात करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी एकोरी वॉर्डातील एकवीरा माता मंदिर येथून मातेच्या पालखीचे प्रस्थान होणार असून, विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत ही पालखी माता महाकाली मंदिरात पोहोचणार आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. Mahakali Festival begins with the installation of a silver idol of the Goddess

  गुरुवारी सकाळी एकवीरा माता मंदिरातून मातेच्या पालखीला सुरुवात होईल. त्यानंतर ही पालखी जैन मंदिर येथे जाईल. पुढे आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पालखीचे आगमन होणार असून, तेथून पालखी माता महाकाली मंदिराकडे प्रस्थान करेल. मंदिरात चांदीच्या मातेच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर महाआरती होणार असून, या धार्मिक सोहळ्यात भाविकांना सहभागी होता येणार आहे.

   महाकाली महोत्सव हा चंद्रपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून मातेप्रती असलेली श्रद्धा, भक्ती आणि परंपरेशी असलेले नाते अधिक दृढ होते. दरवर्षी मातेच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांसाठी हा महोत्सव विशेष महत्त्वाचा असतो. पालखी सोहळा, मूर्ती प्रतिष्ठापना आणि महाआरती अशा धार्मिक विधींमुळे महोत्सवाच्या प्रारंभाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.

  चांदीच्या मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि त्यानंतर होणारी महाआरती च्या सोहळ्याचा मुख्य आकर्षणबिंदू असणार आहे. मातेच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार्या या सोहळ्याने महाकाली महोत्सवाची मंगलमय सुरुवात होणार आहे. श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम असलेल्या या सोहळ्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular