Monday, October 5, 2026
HomeAccidentट्रक पलटी, डीझेल रस्त्यावर; भांड्यांनी इंधन भरले!

ट्रक पलटी, डीझेल रस्त्यावर; भांड्यांनी इंधन भरले!

चंद्रपूर : चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावरील लालपेठ कामगार चौक परिसरात डीझेलने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. अपघातानंतर ट्रकमधील डीझेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहू लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. Diesel Truck Accident

मिळालेल्या माहितीनुसार, डीझेलने भरलेला ट्रक GJ 12 CT 4999 लालपेठ कामगार चौक परिसरातून जात असताना अचानक पलटी झाला. अपघाताची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. सुदैवाने या दुर्घटनेत ट्रक चालक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्रक पलटी झाल्यानंतर त्यातील डीझेल रस्त्यावर सांडू लागले. डीझेल वाहत असल्याचे लक्षात येताच परिसरातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चक्क बादल्या व अन्य भांड्यांमध्ये डीझेल भरून नेण्यास सुरुवात केली. त्यामुळे अपघातस्थळी काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीचा ताबा घेत वाहतूक सुरळीत करण्यासोबतच घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डीझेल सांडल्याने आगीचा धोका निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.

या घटनेमुळे चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. पलटी झालेला ट्रक हटविणे तसेच रस्त्यावर सांडलेले डीझेल साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular