चंद्रपूर :- शहरातील अष्टभुजा वॉर्ड परिसरात राहत्या घरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) छापा टाकून कारवाई केली. LCB Raid
युवतीला घरात कोंबून जबरी चोरी…….
या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून मोबाईल, रोख रक्कम आणि इतर असा एकूण २२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur Crime
गणेशोत्सव यशस्वी करणाऱ्या या घटकांना पोलीस दलाकडून सन्मान……
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी अष्टभुजा वॉर्डातील लव्ह इंडिया चर्चच्या मागील परिसरात एका महिलेच्या राहत्या घरात महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. Local Crime Branch
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी विशेष पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली बनावट ग्राहक पाठवून कारवाईची आखणी केली. Trap
त्यानंतर महिला पंच, सोशल वर्कर तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान मुस्कान शफीक शेख (वय ४०) आणि रेशमा उर्फ तैबुल फतिमा अब्दुल रफीक शेख (वय ४५) या दोघींकडून संगनमताने महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाले. Police
कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली. तसेच मोबाईल, रोख रक्कम आणि इतर वस्तू असा एकूण २२,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपी महिलांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सुनील गौरकार यांच्यासह पोलीस अंमलदार, महिला अंमलदार, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षातील कर्मचारी तसेच सोशल वर्कर सहभागी होते.
