चंद्रपूर :- सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे २२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मनपास्तरीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धेत पी. एम. श्री सावित्रीबाई फुले सेमी इंग्लिश शाळा, बाबुपेठ येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत नागपूर विभागीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. Outstanding performance by Savitribai Phule School students in the school Taekwondo competition
गणेशोत्सवाकरीता चंद्रपूर पोलिसांची कारवाई, करडी नजर……
अंडर-१७ वयोगटात कु. गौरी गणलावर (इयत्ता १० वी), श्रीनिवास मिरवाड (इयत्ता ९ वी) आणि श्रेयस इदे (इयत्ता ९ वी) यांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यांची पुढील नागपूर विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
गणेश विसर्जनासाठी चंद्रपुरात वाहतूक व्यवस्थेत बदल…..
तसेच अंडर-१४ वयोगटात कु. योगिता शेंडे (इयत्ता ७ वी) हिने उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेत यश मिळविले असून, ती देखील पुढील विभागीय स्तरावरील स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, क्रीडा मार्गदर्शक, पालक व क्रीडाप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
