चंद्रपूर :- पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई १५ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आली. या कारवाईत पिकअप वाहनातून वाहतूक करण्यात येत असलेली तीन गोवंशीय जनावरे आढळून आली. Padoli Police Raid Illegal Cattle Smuggling
पोलिसांनी कारवाईदरम्यान एक बोलेरो पिकअप वाहन आणि तीन गोवंशीय जनावरे, असा एकूण अंदाजे ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणात अनिमुद्दीन गुलबुद्दीन शेख (वय २४), ड्रायव्हर, रा. शिवनगर वॉर्ड, घुग्घुस, ता. जि. चंद्रपूर याचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
सदर आरोपीविरुद्ध प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंध अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(d), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) मधील कलम ५, ५(A), ५(B), ९ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ११९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पडोली पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू असून, अवैध जनावर वाहतुकीविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
