चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन 2026 च्या गणेशोत्सवानिमित्त उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. Best Public Ganeshotsav Mandal competition
14 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या शासन निर्णयामध्ये निश्चित करण्यात आलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या अथवा पूर्तता करू शकणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या ganeshostav.pldmka.co.in वर ऑनलाइन अर्ज सादर करावा.
स्पर्धेसंबंधीचा सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.