Friday, September 4, 2026
HomeAccidentवाहतूक शाखा ॲक्शन मोडवर, ५२ वाहनांवर कारवाई

वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर, ५२ वाहनांवर कारवाई

चंद्रपूर :- जिल्ह्यातील वाहतूक कोंडी आणि रस्ता सुरक्षेच्या बिकट प्रश्नावर खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या आक्रमक भूमिकेचा मोठा प्रभाव दिसून आला आहे. काल आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीला प्रमुख अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने संतप्त झालेल्या खासदार महोदयांनी ती बैठक तात्काळ रद्द केली. जबाबदार अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देऊन त्या थेट रस्त्यावर उतरल्या. पाहणीदरम्यान वाहतूक पोलिसांचा ढिसाळ कारभार उघडकीस आल्याने त्यांनी जबाबदार घटकांना तात्काळ कडक कारवाईचे सज्जड निर्देश दिले.

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या ‘सरप्राईज व्हिजिट’ आणि कडक इशाऱ्यानंतर चंद्रपूर शहर वाहतूक शाखा तातडीने ॲक्शन मोडवर आली. पोलिसांच्या ढिम्म कारभाराला चपराक बसताच त्यांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी शहरात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत नियमबाह्य पार्किंग आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर बडगा उगारत दंडात्मक कारवाईचा मोठा धडाका लावण्यात आला. Traffic Police Branch swings into action mode

वाहतूक शाखेने एकाच दिवसात तब्बल ५२ वाहनांवर मोटर वाहन कायदा कलम १२२/१७७ अंतर्गत दंडात्मक कारवाई केली. या कारवाईतून पोलिसांनी एकाच दिवसात ६९,००० रुपयांचा शुल्क वसूल केला आहे. खासदार महोदयांच्या या धडक धोरणामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीर आणि अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स चालक व वाहनधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. Impact of the ‘surprise visit’

केवळ बैठकांपुरते मर्यादित न राहता थेट रस्त्यावर उतरून प्रशासनाला कामाला लावणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यपद्धतीचे सर्वसामान्यांकडून जोरदार स्वागत होत आहे. आता चंद्रपूर शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी ‘ट्रक टर्मिनल’ची जागा शोधणे आणि खाजगी ट्रॅव्हल्ससाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करणे, या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निर्देशांवरही प्रशासनाने वेगाने काम सुरू केले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular