Wednesday, August 19, 2026
HomeElectionSIR व पक्षसंघटन मजबूत करण्यावर काँग्रेसचा भर

SIR व पक्षसंघटन मजबूत करण्यावर काँग्रेसचा भर

चंद्रपूर :- आगामी काळातील संघटनात्मक आव्हाने आणि पक्षाच्या विविध उपक्रमांना गती देण्याच्या दृष्टीने जिवती तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अन्नाभाऊ साठे सभागृह जिवती येथे काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठक उत्साहात पार पडली. जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे Subhash Dhote यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत SIR अंतर्गत BLA यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेत पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. Congress focuses on strengthening SIR and party organization वॉर्ड निहाय मतदार याद्यांची अचूक तपासणी हेच प्राथमिक कर्तव्य……

यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांनी SIR प्रक्रियेंतर्गत BLA यांच्याकडून सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली. उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच यापुढील टप्प्या अधिक महत्त्वाचा असून मतदार यादी पुनर्निरीक्षणाच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करून पात्र मतदारांची नोंद, आवश्यक दुरुस्त्या आणि संबंधित बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. Reviewed the SIR-related work of BLAs नेताजी सुभाष चंद्र बोस यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन…..

तसेच जिवती तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विविध अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. SIR सोबतच बूथस्तरापासून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने संपर्क, सक्रिय सहभाग आणि नियोजनबद्ध काम करण्याचे आवाहन धोटे यांनी केले.

स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

काँग्रेसच्या विचारधारेचा आणि पक्षाच्या जनकल्याणकारी भूमिकेचा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संवाद साधावा. आगामी काळात संघटनात्मक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज असल्याचेही सुभाष धोटे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे, माजी अध्यक्ष गणपत आडे, प्रा. सुग्रीव गोतावळे, सिताराम मडावी, अल्पसंख्याक विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ताजुद्दीन शेख, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल कांबळे, तिरुपती भाऊ पोळे,प्रदीप काळे, विजय राठोड, योगेश पट्टेवाले, उत्तम कराळे, नामदेव जुमनाके, विजयकुमार कांबळे, पाचंगे,बंडूभाऊ राठोड, दत्ताजी तोगरे, ढोबा पाटील कोटनाके, बाजीराव वलका, भोजे पाटील आत्राम, नागनाथ महाराज तोगरे, गणेश वाघमारे, प्रकाश मोतेवार,डुकरे सर, मारुती मोरे, केशव भालेराव, माधव शेंबडे, मारुती कांबळे, कैलास कुंडगीर, बाळू पतंगे साहेबराव इंगळे, रणक्षेत्रे, गायकवाड, मस्के,सुधाकर जाधव, जयंत आडे, देविदास कांबळे, यांच्यासह जिवती तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, BLA तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संचालन योगेश पट्टेवाले यांनी तर प्रास्ताविक डॉ. अंकुश गोतावळे यांनी केले तर आभार श्री बंडू राठोड यांनी मानले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular