चंद्रपूर :- “तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे. तिरंगा घरावर फडकविण्याबरोबरच देशाप्रती आपली निष्ठा आणि अभिमान व्यक्त करावा,” असे प्रतिपादन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे Dr. Ashok Jivatode यांनी केले. Grand Tricolour rally held in Chandrapur under the ‘Har Ghar Tiranga’ campaign
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आवाहनानुसार ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यंदा राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने या अभियानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या अभियानाच्या निमित्ताने चंद्रपूर शहरात डॉ. अशोक जीवतोडे यांच्या सहभागातून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
तिरंगा व तीन रंगाचे फुगे हातात घेऊन मोठ्या उत्साहात नागरिक रॅलीत सहभागी झाले. देशभक्तीपर घोषणा, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. महिला आणि युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग हे रॅलीचे विशेष आकर्षण ठरले.
रॅलीदरम्यान नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. विविध ठिकाणी नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. संपूर्ण रॅलीदरम्यान देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी डॉ. अशोक जीवतोडे यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा उद्देश स्पष्ट करताना नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले. तसेच राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून अधिकृत ‘हर घर तिरंगा’ संकेतस्थळावर अपलोड करून या राष्ट्रीय अभियानात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
“आजच्या तिरंगा रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा चंद्रपूरकरांच्या मनातील राष्ट्रप्रेमाची साक्ष आहे. महिला, युवक आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहता ‘हर घर तिरंगा’चा संदेश निश्चितच घराघरात पोहोचला आहे. तिरंगा आपल्या सर्वांना एकत्र आणणारा आणि भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा ध्वज आहे,” असे डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले.
उत्स्फूर्त सहभाग आणि देशभक्तीच्या वातावरणात तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या माध्यमातून चंद्रपूर शहरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला असून, आगामी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
यावेळी डॉ. अशोक जीवतोडे, डॉ. प्रतिभा जीवतोडे यांचेसह माजी नगरसेवक देवानंद वाढई, मंडळ अध्यक्ष रवी जोगी, अक्षय शेंडे, कौसर खान ताई, मयूर हेपट, दिलीप कारलेवार, उदय बाम, निंदेकर, मंगेश अहिरकर, राजन ठाकूर, अनिश दीक्षित, राकेश बोमनवार, सोनू शुक्ला, शाश्वत साठवणे, शुभम रणदिवे, प्रमोद ठोंबरे, धर्मेंद्र पंडित, शुभम घाटे, सचिन दिघाडे, आदी मोठ्या संख्येने महिला, तरुण व नागरिक उपस्थित होते.