Tuesday, August 4, 2026
HomeCulturalशरदराव पवार महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शरदराव पवार महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

चंद्रपूर : लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणारा ‘लेखन प्रेरणा दिन’ शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

तीन विधेयक, जो सरकार बदल सकते है…….

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ. हेमचंद दुधगवळी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवास, साहित्यनिर्मिती, कथा, कादंबऱ्या, लोकशाहीर म्हणून केलेले कार्य तसेच सामाजिक परिवर्तनासाठी त्यांच्या लेखणीचे योगदान यांचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून अण्णाभाऊ साठे यांचे लेखन आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय गोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याचा, वंचित समाजासाठीच्या लढ्याचा आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

दारूच्या या ब्रँडच्या विक्रीवर बंदी…….

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देवानंद चुनारकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. कु. उज्ज्वला जानवे यांनी केले.

याप्रसंगी डॉ. सुनील बिडवाईक, डॉ. शरद बेलोरकर, डॉ. माया मसराम, डॉ. सत्येंद्र सिंह, ग्रंथपाल मंगेश करंबे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास करून लेखनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular